September 14, 2024

‘कानडा के प्रकार’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. १५ मे, २०२३ : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या वतीने येत्या शुक्रवार दि. १९ मे, २०२३ रोजी सायं ५.३० वाजता नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृह या ठिकाणी ‘कानडा के प्रकार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना विदुषी सानिया पाटणकर म्हणाल्या, “आजकाल रात्रीच्या प्रहरी गायले जाणारे राग आणि कानडाचे विविध प्रकार रात्रीच्या मैफली दुर्मिळ झाल्यामुळे फार ऐकायला मिळत नाहीत. हेच लक्षात घेत ‘कानडा के प्रकार’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांना कानडाचे विविध प्रकार ऐकविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यामध्ये मी स्वत: आणि माझे विविध शहरांमधील विद्यार्थी १४ प्रकारचे कानडे सादर करणार असून यामध्ये दरबारी, नायकी, अभोगी, काफी कानडा, कौशी कानडा, शहाणा, रायसा, सुहा, बहार, अडाणा प्रस्तुत करणार आहे. यासोबतच विविध बंदिश, तराणा, त्रिवट, थाटमाला, सरगमगीत या गीत प्रकारांमधून रसिकांना माहितीपूर्ण विवेचन व कानड्यांचा वेध घेता येणार आहे.”

सदर कार्यक्रमात विदुषी सानिया पाटणकर यांना प्रशांत पांडव, अभिनव रवंदे, कार्तिकस्वामी हे साथसंगत करणार आहेत. स्वाती प्रभू मिराशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.