पुणे, ३१ डिसेंबर २०२४ ः विश्रांतवाडी येथील मुकुंदराज आंबेडकर चौकात उड्डाणपुलासह समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या चौकातील दोन्ही पादचारी पुल काढले. त्यापैकी एका पादचारी पुलाचा वापर जंगली महाराज रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालय वसतिगृह व मैदानादरम्यान बसविला. तर दुसरा पादचारी पुल विश्रांतवाडीजवळीलच प्रतिकनगर येथे बसविला जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडुन विश्रांतवाडी येथील मुकुंदराज आंबेडकर चौकातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी तेथे उड्डाणपुल व समतल विलगक तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, संबंधित कामाला सुरवातही करण्यात आली. तत्पुर्वी या चौकात नागरीकांना ये-जा करण्यासाठी दोन पादचारी पुल उभारण्यात आले होते. हे दोन्ही पादचारी पुल महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने काढले. दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) महापालिकेस रस्ता रुंदीकरणासाठी जागा दिली होती. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुल तयार करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्यांच्याकडुन महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा देखील केला जात होता.
दरम्यान, महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने “सीओईपी’ने महापालिकेस केलेली मदतीची जाणीव ठेवून, त्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना पादचारी पुल तयार करून देण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार, विश्रांतवाडी येथील काढलेला पादचारी पुल जंगली महाराज रस्त्यावरील “सीओईपी’ वसतिगृह व त्यासमोरील त्यांच्याच मैदानास जोडण्यासाठी संबंधित पुल उभारण्याचे काम महापालिकेने करुन दिले. त्यानंतर आता विश्रांतवाडीजवळील प्रतिकनगर येथुन नागरीकांना बीआरटी मार्गामुळे रस्ता ओलांडणे अडचणीचे ठरत असल्याने, त्या ठिकाणी दुसरा पादचारी पुल उभारण्याचे काम आता महापालिकेकडुन केले जाणार आहे.
प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता
युवराज देशमुख म्हणाले, अभियांत्रीकी महाविद्यालयाने केलेल्या मागणीनुसार त्यांना पादचारी पुल तयार करुन देण्याचे काम पुर्ण केले आहे. प्रतिकनगर येथेही पादचारी पुलाचे काम सुरु केले आहे. विश्रांतवाडी येथील काढलेल्या पादचारी पुलाचाच पुर्नवापर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या पैशांची बचत झाली आहे.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार