September 10, 2024

पीएमडीटीए – 14, 17 वर्षाखालील, पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

पुणे, 2 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए – 14, 17 वर्षाखालील, पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 6 ते 13 मे , 2023 या कालावधीत रंगणार आहे. 
 
14 वर्षाखालील गटातील टेनिस स्पर्धा 6 ते 8 मे या कालावधीत, 17  वर्षाखालील स्पर्धा 9 ते 11 मे या कालावधीत, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी टेनिस स्पर्धा 12 ते 14 मे या कालावधीत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड आगामी राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी होणार असून हि स्पर्धा केवळ पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठीच खुली असणार असल्याचे पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
 

 14 वर्षाखालील गटातील खेळाडू हे आगामी कोल्हापूर येथे 17 व 18 मे रोजी होणाऱ्या सरदार मोमीन मेमोरियल राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. याशिवाय राज्य स्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडूंना कोल्हापूर येथे  20 मे रोजी होणाऱ्या 16 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी पात्रता फेरीत थेट वाईल्ड करद्वारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे ताम्हाणे यांनी नमूद केले.