पुणे, १४ जून २०२५ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे भाविकांच्या सोयीसाठी जादा बससेवेचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. १६ जून ते २० जून २०२५ या कालावधीत आळंदी आणि देहू येथे जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील विविध स्थानकांवरून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आळंदीकरिता विशेष बससेवा ः
-१६ ते २० जून दरम्यान: स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड आणि पिंपरीरोड येथून रोजच्या १४६ बसेसचा समावेश.
-१९ जून रोजी: रात्री १२:०० वाजेपर्यंत बसेस चालू ठेवण्यात येतील.
– २० जून रोजी: प्रस्थानाच्या दिवशी पहाटे ३:०० वाजल्यापासून आळंदीला जाण्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर आणि म.न.पा. येथून १६ अतिरिक्त बसेस.
देहूकरिता नियोजनः
-१६ ते २० जून दरम्यान: पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी येथून ३७ बसेसची सोय.
-देहू ते आळंदी दरम्यान: २३ बसेसची व्यवस्था.
नेहमीच्या सेवा व अतिरिक्त व्यवस्थाः
-सकाळी ५:३० पासून: पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील स्थानकांवरून ११३ नियमित बसेस भोसरी आणि विश्रांतवाडीमार्गे आळंदीला.
-प्रवाशांची संख्या ४० पेक्षा अधिक असल्यास जादा बसेस उपलब्ध.
२२ जून रोजी हडपसरमधील विशेष सेवाः
-दोन्ही पालख्या हडपसर येथे दुपारी १२:०० ते १:०० दरम्यान थांबणार असल्याने महात्मा गांधी बसस्थानकावरून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी आदी ठिकाणी बससेवा.
-शिवरकर गार्डनहून कात्रज-कोंढवे आणि मगरपट्टा येथून मुंढवा, चंदननगर, वाघोलीकडे बससेवा.
पालखी मार्गानुसार सोलापूर व सासवड रस्त्यावरील नियोजनः
-पालखी सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. सोलापूर/उरुळी कांचन मार्ग खुला झाल्यानंतर बससेवा सुरु ठेवण्यात येईल.
-दिवेघाट मार्ग बंद राहणार असून, पर्यायी मार्ग बोपदेव घाट वापरून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर येथून ६० जादा बसेस चालवण्यात येतील.
दरम्यान सर्व भाविक व प्रवासी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा आणि वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
More Stories
पुणे मेट्रोच्या ताफ्यात लवकरच नवीन १२ मेट्रो ट्रेन सेट
पुणे: जवानाच्या वेळीच धाव घेतल्याने टळली दुर्घटना; खिडकीत अडकलेल्या चार वर्षाच्या मुलीचे वाचवले प्राण
Pune: डिजे लावणार्या गणेश मंडळांना मदत नाही, डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार