पुणे, दि. ११/०४/२०२३: महिलेला गाडीवरुन सोडल्याच्या रागातून तिघाजणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केला. त्याशिवाय भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणार्या महिलेसह तिच्या मुलावर विटा फेकून मारल्याची घटना ८ एप्रिलला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसरमधील साडेसतरानळी परिसरात घडली.
अंतम गायकवाड (वय ३७, रा. साठेवस्ती, हडपसर ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी प्रेमदास वानखेडे, स्वप्नील अंतम गायकवाड, आशिष अंतम गायकवाड अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतम आणि प्रेमदास शेजारी राहायला असून ८ एप्रिलला अंतम याने प्रेमदासच्या पत्नीला दुचाकीवरुन घरी सोडले होते. त्याच रागातून प्रेमदासने इतर दोघांच्या मदतीने अंतमला बेदम मारहाण केली. त्याच्यावर शस्त्राने वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन