पुणे, दि. २०/०८/२०२३: सोने खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये गेलेल्या जेष्ठ महिलेच्या पर्समधील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना १० ऑगस्टला दुपारी तीनच्या सुमारास रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला येरवडा परिसरात राहायला असून १० ऑगस्टला रविवार पेठेतील ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून पर्समधील २४ हजारांची रोकड आणि दोन सोनसाखळ्या असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. महिलेला काही वेळानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पवार तपास करीत आहेत.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन