पुणे, दि. २०/०८/२०२३: रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी भर दुपारी महिलेच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंदननगरमधील संघर्ष चौकात घडली. यापकरणी माया शिंदे (वय ५०, रा. लोहगाव) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया लोहगाव परिसरात राहायला असून कामानिमित्त चंदननगरमधील संघर्ष चौकातून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मायाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक अरिंवद कुमरे तपास करीत आहेत.

More Stories
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
दहावी-बारावीच्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा; पुणे विभागात तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा रंगांतून साकारला