पुणे, दि. ०३/०३/२०२३: भरदिवसा मोबाइल हिसकाविणार्या सराईताला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइल, दुचाकी असा ७८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी कर्नाटक राज्यातील सराईत असून त्यांची मोबाईल चोरीची आंतराज्यीय टोळी असण्याचीही शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शरद मंजुनाथ (वय २२ रा. होसमने भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मोबाइल चोरीची घटना १ मार्चला लुल्लानगरमध्ये घडली होती.
मोबाइल चोरीच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या आदेशानुसार तपास पथकाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अमलदार सचिन पवार व उत्रेश्वर धस यांना आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांच्या पथकाने सापळा रचून शरदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाइल, दुचाकी जप्त करण्यात आली. ही कामगिरी अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक संदिप शिवले, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, विनोद भंडलकर,संतोष नाईक, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, उत्रेश्वर धस, सचिन पवार, विठ्ठल चोरमले यांनी केली.
मोबाइल हिसकावणारी आंतरराज्य टोळीची शक्यता
अटक केलेला आरोपी शरद मंजुनाथ कर्नाटक राज्यातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पुण्यातून नागरिकांचे मोबाइल हिसकावून लुटमार करणारी त्यांची टोळी असण्याची शक्यता वानवडी पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर