पुणे, १०/०७/२०२३: लष्करातील जवानाला मारहाण करुन लुटल्याची घटना घोरपडीतील सोपानबाग परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत परशुराम बसप्पा नगराळे (वय ३९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगराळे आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये चालक आहेत. नगराळे घोरपडीतील सोपानबाग परिसरातून सायकलवरुन निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी एका सुरक्षारक्षक माेहित साकेत याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी साकेतला धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. नगराळे यांनी लूटमारीचा प्रकार पाहिला आणि चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी सायकलस्वार नगराळे यांना दगड फेकून मारला. त्यांना चाकुचा धाक दाखवला. नगराळे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला.
सुरक्षारक्षक साकेत याला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला. चोरट्यांनी दोन मोबाइल संच, रोकड असा १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.
More Stories
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान
हडपसर मध्ये प्रशांत जगताप यांना मुस्लिम समाजाचे आव्हान, शरद पवारांकडे महत्वाची मागणी