पुणे, १९/०३/२०२३: शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून पोलिसांनी वीस फूट उंचीवरुन उडी मारुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले.
दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. न्यायालयाने जाधव याच्या विरुद्ध वाॅरंट बजावले होते. वाॅरंट रद्द करण्यासाठी जाधव न्यायालयात आला होता. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
न्यायालयात सुनावणी सुरू असताना जाधव न्यायालयीन कक्षातून पळाला आणि वीस फूट उंचीवरुन उडी मारली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. न्यायालायने जाधव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जाधव याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात अली आहे.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान