May 9, 2024

पुण्यातील रांका ज्वेलर्सचा ‘जेम अँड ज्वेलरी इंडस्ट्री लिजंड’ पुरस्काराने गौरव

पुणे, दि. ४ ऑगस्ट, २०२३ : ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी)च्या वतीने पुण्यातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्स यांचा जेम अँड ज्वेलरी इंडस्ट्री लिजंड पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सोने-चांदीच्या व्यवसायात रांका ज्वेलर्स मागील १४४ वर्षे कार्यरत आहेत त्याबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांच्या सक्रीय सहभागाबद्दल कौन्सिलच्या वतीने हा विशेष सन्मान करण्यात आला आहे.

नुकत्याच मुंबईमधील जिओ कन्वेन्शन सेंटर येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विपुल शाह, उपाध्यक्ष किरीट भंसाळी, निमंत्रक नीरव भंसाळी, संचालक सब्यासची रे यांच्या हस्ते सदर पुरस्कार रांका ज्वेलर्सचे संचालक फतेचंद रांका यांनी स्वीकारला. यावेळी ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, अनिल रांका, तेजपाल रांका, वास्तुपाल रांका, शैलेश रांका, श्रेयस रांका, मानव रांका, श्लोक रांका, ऋषभ रांका, विवान रांका, मोनिका रांका, आशा रांका, गहना रांका, क्रीती रांका, नीता कोठारी, सरिता मेहता, जोत्स्ना लुंकड आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावर देण्यात आलेल्या या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यरत असलेले सोने चांदीचे व्यवसायिक यांसमोर आज रांका ज्वेलर्सचा झालेला सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. १४४ वर्षांच्या आमच्या विश्वासार्ह्यतेचा हा गौरव आहे, आमच्या संपूर्ण परिवारासाठी हा एक महत्त्वाचा व गौरवास्पद क्षण आहे, असे फतेचंद रांका यांनी सांगितले.

सोने-चांदीच्या व्यवसायात रांका परिवाराची ही सातवी पिढी असून रांका ज्वेलर्सची स्थापना ही १९६८ साली झाली. आज रांका ज्वेलर्सची एकूण १.५० लाख स्केअर फूट जागेची १३ दालने असून यामध्ये १५०० इतका स्टाफ कार्यरत आहे. रांका ज्वेलर्स हा आज केवळ महाराष्ट्रापुरता ब्रँड राहिला नसून देशात त्यांचे नाव विश्वासार्ह्यतेने घेतले जाते. याबरोबरच सामाजिक कार्यात देखील रांका ज्वेलर्स सक्रीय असून गोशाळा, डायलिसीस सेंटर, विशेष मुलांसाठीचे उपक्रम यांमध्ये ते काम करतात.

सोने चांदी  व्यवसायात ब्रँड अॅम्बसिडर आणण्याचा ट्रेंड हा रांका ज्वेलर्स यांनी सुरु केला. आजवर त्यांच्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन, डिंपल कपाडिया- ट्विंकल खन्ना, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी आणि रुपाली भोसले यांनी ब्रँड अॅम्बसिडर म्हणून काम केले आहे.

ऑल इंडिया गोल्ड अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ही भारतातील ज्वेलर्सची सर्वांत मोठी संस्था असून सदर कार्यक्रमासाठी देशभरातून अनेक सोने-चांदी व्यापारी उपस्थित होते.