May 10, 2024

पुणे: एटीएम मशीनची छेडछाड -दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे, ०५/०८/२०२३: कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मशीनची छेडछाड करून १० हजार रुपये पळविण्याचा प्रकार सोमवार पेठेत घडला.

याप्रकरणी बँकेचे मॅनेजर विशाल गवळी (वय-३७, रा. हांडेवाडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धर्मेंद्र श्रीशिवलाल रारोज (वय-३०), सोनूकुमार जगदेव सरोज (वय-२८, रा. दोघेही प्रतापगड, उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवार पेठेत अपोलो थिएटरच्या मागे कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मशीन आहे. आरोपी कोटक एटीएम मशीन केंद्रात सुरक्षा रक्षक नसल्याचा फायदा घेत. एटीएम मशीन मधून जिथून पैसे बाहेर येतात तिथे मेटलची पट्टी लावायचे. जेव्हा खातेदार एटीएम मशीन मधून पैसे काढायचे तेव्हा त्यांना मशीन मध्ये पैसे अडकले आहेत असे वाटायचे आणि मशीनला छेडछाड नको करायला म्हणून ते तसेच निघून जायचे याचा फायदा आरोपी घेत असत. या आरोपींनी शहरात अजून काही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे करत आहेत.