पुणे, २५ ऑक्टोबर २०२४: मनसेने विधानसभा निवडणुकीसाठीची चौथी यादी जाहीर केली. या यादीत कलीना, केज, कोल्हापूर उत्तर, चिखली आणि पुण्यातील कसबा पेठ या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. मनसेने आतापर्यंत ७० मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. चौथ्या यादीत मनसेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर या मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी करणारे पत्र ब्राह्मण संघटनेने दिले होते. कसबा पेठमधून भाजपकडून हेमंत रासने आणि धीरज घाटे हे दोघे इच्छुक आहेत. भाजपचा उमेदवार ठरण्याआधी मनसेने कसबामधून उमेदवारी जाहीर करत भाजपला एक प्रकारे धक्का दिला आहे. गणेश भोकरे मैदानात उतरल्याने या मतदारसंघातील चुरस आणखी वाढणार आहे. सोबत ब्राह्मण मतदार अधिक असलेल्या कसबामध्ये भाजप कोणता उमेदवार देते यावर त्यांच्या विजयाची गणिते ठरणार आहेत.
More Stories
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम, डॉ. राजेंद्र भोसले ३१ मे राेजी सेवानिवृत्त होणार
Pune: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगणाऱ्या शिवसृष्टीला लहान थोरांचा मोठा प्रतिसाद