पुणे, २६ ऑक्टोबर २०२४: बाणेर येथील टेकडीवर सकाळी फिरायला गेलेल्या महिलांना मारहाण करून लुटमारत करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सुरक्षेचा प्रश्न आहे आणि वर आलेला असताना पोलिसांनी एक पाऊल पुढे येऊन आज बाणेर टेकडीवर सुमारे ३०० नागरिकांसोबत संवाद साधला. टेकडीवर कुठलेही गुन्हे घडून येत यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे पोलिसांनी नागरिकांना सांगितले त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी बाणेर टेकडीवर न्यायालय येथील तीन महिलांना काही तरुणांनी मारहाण करून लुटले होते या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे नुकत्याच स्थापन झालेल्या बाणेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ही गंभीर घटना घडल्याने बाणेर पोलिसांनी आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार टेकडीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हे च्या अनुषंगाने पोलिसांची भूमिका व कर्तव्ये , बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी आज (दि.२६) रोजी सकाळी साडे सहाला भेट दिली. त्यावेळी नागरिकांना सूचना दिल्या.
– गुन्हा घडल्यास तात्काळ मदतीकरिता ११२ व १०० नंबरवर फोन करा
– पुणे शहर पोलिसांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
- जेष्ठ नागरिक यांच्याकरिता बाणेर पोलिस ठाण्याकडून उपाययोजना केली जात आहे
– एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहिती संकलन व मदत करणे
– सायबर गुन्हे फसवणूक बाबत माहिती
– बाणेर टेकडीवर जाणारे नागरिक यांचे करिता एकूण दहा ते बारा मार्गांवर सूचना फलक त्याचेवर अत्यावश्यक सेवा,बाणेर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांचे क्रमांक व व्हाट्सअप ग्रुप क्रमांक जाहीर करणे
– बाणेर परिसरामध्ये चालू करण्यात येणारे पोलीस मदत केंद्र
– शहरातील सर्व टेकड्यांवर सीसीटीव्ही लावले जाणार.
आजच्या बैठकीस सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली व नागरिकांनी सकारात्मक रित्या प्रतिसाद देऊन सायंकाळी ६ ते पहाटे ५ पर्यंत बाणेर टेकडीवर कोणीही जाऊ नये याबाबत सर्व नागरिकांमध्ये संदेश देऊन नागरिकांना स्वतःहून सूचना देणार असलेबाबत माहिती दिलेली आहे – महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलीस ठाणे
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा