October 3, 2024

पुणे: ओशाेंचे अनुयायी आणि पोलिसांची बाचाबाची, अंगावर धावून जाणाऱ्या दोन ते तीन अनुनायांना पोलिसांकडून चोप

पुणे, २२/०३/२०२३: कोरेगाव पार्क भागातील ओशो आश्रमातील व्यवस्थापन आणि शिष्यांच्या एका गटात सुरु असलेल्या वादातून काही अनुनायांनी आश्रमाचे प्रवेशद्वार उघडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलीस आणि अनुनयांमध्ये वादावादी झाली. दोन ते तीन अनुनायी पोलिसांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी त्यांना चोप देऊन प्रवेशद्वाराबाहेर जमलेल्या अनुनयांना बळाचा वापर करुन पांगविले.

ओशो तथा रजनीश यांच्या अनुयायांकडून मंगळवारी संबोधी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ओशो आश्रमाचे व्यवस्थापन आणि शिष्यांच्या एका गटात वाद सुरू आहेत. अनुयायांना आश्रमात येण्यास प्रवेश नाकारण्यात आला होता. त्या वेळी अनुयायी ओशो आश्रम परिसरातील प्रवेशद्वारासमोर जमले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही अनुयायांनी आश्रमाचे प्रवेशद्वार उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अनुयायांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

दोन ते तीन अनुयायी पोलिसांच्या अंगावर धावून गेले. तेव्हा पोलिसांनी त्यांना चोप दिला. पोलिसांनी बळाचा वापर करुन ओशो आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर जमलेल्या अनुयायांना पांगविले. ओशो आश्रमाच्या व्यवस्थानाने आश्रमाची जागा विक्रीसाठी काढली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापन आणि शिष्यांचा वाद सुरू आहे. आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मंगळवारी अनुयायांना आत प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. आमच्या लढयाला यश आले. मात्र, बुधवारी व्यवस्थापनाने पोलिसांना हाताशी धरुन बळाचा वापर केला, असा आरोप अनुयायांनी केला.