March 5, 2026

सहाव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब, कॅडेन्स संघांची विजयी आगेकूच

पुणे, 5 फेब्रुवारी 2026- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र क्रिकेट संघटना(एमसीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सहाव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पुना क्लब, कॅडेन्स या संघांनी सलग दुसऱ्या विजयासह आपली आगेकूच कायम राखली.

कटारिया हायस्कूल मैदानावरील लढतीत पार्थ तापकीर(नाबाद 121) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर पुना क्लब संघाने स्टार्स क्रिकेट क्लब संघाचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्टार्स क्रिकेट क्लब संघाने 50 षटकात 8बाद 270धावाचे आव्हान उभे केले. यात शुभंकर हार्डीकरने 100चेंडूत 8चौकार व 1षटकाराच्या मदतीने 87धावा, मालोजी निगडेने 51चेंडूत 4चौकार व 2षटकारासह 41धावा, स्वप्नील वाळंजने 22, सिद्धेश वरघंटीने 23, शुभम मोरेने 22 धावा केल्या. हे आव्हान पुना क्लब संघाने 46 षटकात 4बाद 274धावा करून पूर्ण केले. यात पार्थ तापकीर याने 129चेंडूत नाबाद 121 धावांची शतकी खेळी करताना संघांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यात त्याने 14चौकार व 2षटकार मारले. पार्थला अजिंक्य नाईकने 73चेंडूत 8चौकरसह नाबाद 68धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेट साठी 149 चेंडूत 157 धावांची भागीदारी करून संघाला 6 गडी राखून विजय मिळवून दिला

डिझायर मैदान, लोणी काळभोर येथील मैदानावरील सामन्यात पहिल्यांदा खेळताना आर्यन्स क्रिकेट अकादमीचा डाव 43 षटकात सर्वबाद 189धावावर संपुष्टात आला. यात रोशन वाघसरे 35, ऋषीकेश कातकडे नाबाद 36, सुजित यादव 28, सिद्धांत दोशी 23 यांनी धावा केल्या. कॅडेन्स संघाकडून आर्य पानसे(4-44), ओंकार मोहिते(3-26) यांनी सुरेख गोलंदाजी करत आर्यन्स संघाला 189धावावर रोखले.

याच्या उत्तरात कॅडेन्स संघाने 33.3 षटकात 5बाद 190धावा करून हे आव्हान पूर्ण केले. यात धीरज ढेरेने 79चेंडूत 8चौकार व 2षटकाराच्या मदतीने 73धावा, अथर्व धर्माधिकारीने 62चेंडूत 10चौकार व 1षटकाराच्या सहाय्याने 62धावा, एस नवलेने 26, हर्षल काटेने 20 काढून संघाला विजय मिळवून दिला.

निकाल: साखळी फेरी:
कटारिया हायस्कूल मैदान :
स्टार्स क्रिकेट क्लबः 50 षटकात 8बाद 270धावा(शुभंकर हार्डीकर 87(100,8×4,1×6) मालोजी निगडे 41(51,4×4,2×6), स्वप्नील वाळंज 22, सिद्धेश वारघंटे 23, शुभम मोरे 22, धनराजसिंग परदेशी 2-67, समर्थ भोसले 2-43, अखिलेश गवळी 2-50)पराभुत वि. पुना क्लब: 46 षटकात 4बाद 274धावा(पार्थ तापकीर नाबाद 121(129,14×4,2×6), अजिंक्य नाईक नाबाद 68(73,8×4), अर्जुन वाघ 45(46,6×4), श्रीनिवास लेहेकर 2-39) सामनावीर – पार्थ तापकीर; पुना क्लब संघ 6 गडी राखून विजयी;

डिझायर क्रिकेट मैदान, लोणी काळभोर:
आर्यन्स क्रिकेट अकादमी: 43 षटकात सर्वबाद 189धावा (रोशन वाघसरे 35, ऋषीकेश कातकडे नाबाद 36, सुजित यादव 28, सिद्धांत दोशी 23, आर्य पानसे 4-44, ओंकार मोहिते 3-26) पराभुत वि. कॅडेन्स: 33.3 षटकात 5बाद 190धावा(धीरज ढेरे 73(79,8×4,2×6), अथर्व धर्माधिकारी 62(62,10×4,1×6), एस नवले 26, हर्षल काटे 20, प्रतीक भालेराव 4-59); सामनावीर – आर्य पानसे; कॅडेन्स संघ 5 गडी राखून विजयी.