पुणे, 5 फेब्रुवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 2026(पीसीबीएसएल) स्पर्धेत आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, रिओज सोलर एनर्जी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा आणिसहप्रायोजक सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी यांच्या पाठिंब्यामुळे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आरएस कॅनन्स संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. विजयी संघाकडून कपिल पंजाबी, शैलेश चौबे, क्रिश रघानी, अनिल काकडे, कपिल पंजाबी, रिकी राजपाल यांनी सुरेख कामगिरी बजावली.
दुसऱ्या सामन्यात जयदीप पटवर्धन, आशिष पटेल, राजीव राऊत, जयदीप पटवर्धन, धीरज कोचर, आशिष पटेल, जमशेद गार्डा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बॉल ब्रेकर्स संघाने संघवी शूटर्स संघावर 4-1 असा एकतर्फी विजय मिळवला. अन्य लढतीत रिओज सोलर एनर्जी संघाने मनीषा रॉयल्स संघाचा 4-1 असा पराभव करून पहिला विजय मिळवला. रिओज सोलर एनर्जी संघाकडून सूरज राठी, साहिल हांडा, मिनू कारकरीया, नीरज अरोरा, कपिल सामंत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
निकाल: लीग फेरी:
आरएस कॅनन्स वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: कपिल पंजाबी वि.वि.दिनेश महतानी 70-41; बिलियर्ड्स: कैवल्य खानापुरे पराभुत वि.कपिल सरीन 182-200; रुलेट:शैलेश चौबे/क्रिश रघानी/अनिल काकडे/कपिल पंजाबी/रिकी राजपाल वि.वि.सरीम खान/कपिल सरीन/दशमेश कालरा/उदित संघवी/दिनेश महतानी 2-1; 9रेड स्नूकर दुहेरी: अनिल काकडे/रिकी राजपाल वि.वि.सरीम खान/उदित संघवी 67-49; 6 रेड स्नूकर: पंकज परमार पराभुत वि.दशमेश कालरा 38-41, 26-51);
बॉल ब्रेकर्स वि.वि.संघवी शूटर्स 4-1(15 रेड स्नूकर एकेरी: जयदीप पटवर्धन वि.वि.सुनील आशर 88-65; बिलियर्ड्स: आशिष पटेल वि.वि.आरके शर्मा 200-141; रुलेट: राजीव राऊत/जयदीप पटवर्धन/धीरज कोचर/आशिष पटेल/जमशेद गार्डा वि.वि.शाम राठी/गिरीश दामले/सुनील आशर/गिरीश खोसला/रुसी मारोलिया 2-1; 9रेड स्नूकर दुहेरी: धीरज कोचर/राजीव राऊत पराभुत वि.शाम राठी राठी/रुसी मरोलिया 35-45; 6रेड स्नूकर एकेरी: जमशेद गार्डा वि.वि. गिरीश दामले 48-41, 45-17);
रिओज सोलर एनर्जी वि.वि.मनीषा रॉयल्स 4-1(15रेड स्नूकर एकेरी: सूरज राठी वि.वि.आशीष खेरा 113-58; बिलियर्ड्स: साहिल हांडा वि.वि.अश्रफ परवानी 200-164; रूलेट: सूरज राठी/साहिल हांडा/मिनू कारकरीया/नीरज अरोरा/कपिल सामंत वि.वि.कुणाल वासवानी/योगेश अंकलेसारिया/अश्रफ परवानी/आशीष खेरा/अयान खान 3-1; 9 रेड स्नूकर दुहेरी: मिनू कारकरिया/नीरज अरोरा वि.वि.योगेश अंकलेसारिया/कुणाल वासवानी 52-42, 6 रेड स्नूकर एकेरी: कपिल सामंत पराभुत अयान खान 13-41, 12-46)

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत द बिग डिंक्स संघांचा दुसरा विजय
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स, परशुरामियन्स एफसी, स्निग्मय पुणे एफसी, जीओजी एफसी संघांची विजयी सलामी