खडकी, ०५/०४/२०२३: तरूणीला शितपेय्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार करणार्या मुख्य आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर याच्यावर अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
मुख्य संशयीत आरोपी दिक्षांत गौतम चव्हाण (22), माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर (दोघेही रा. रेंजहिल्स, खडकी) आणि डॉन नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 22 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार मे 2019 ते मार्च 2023 दरम्यान घडला.
दिक्षांत चव्हाण ने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला लग्ना संदर्भात त्याच्या आई-वडीलांना तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगून घरी बोलावले. तिला शितपेय्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुध्द पडल्यानंतर दिक्षांतने तिच्यावर बलात्कार केला. अश्लिल कृत्याचे चित्रीकरणही त्याने त्याच्या मोबाईलमध्ये काढले. तिला तु माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझा काढलेला व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी दिली.
त्यानंतर दुर्योधन भापकर याने तरूणीला व्हिडीओ माझ्याकडे आहे म्हणून तिचा हात पकडून अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर डॉन याने तरूणीला तु कोणाच्या नादी लागते, तुला भापकर हे कोण आहेत हे माहित आहेत का ? ते तुला संपवुन टाकतील असे म्हणून डॉनने त्याच्याजवळील पाच हजार रूपये तरूणीला देवुन तु आता येवढे पैसे तुझ्याकडे ठेवुन घे व घडलेला विषय संपवुन टाक, नाहीतर तुला खल्लास करून टाकायला वेळ लागणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान