पुणे, २९ ऑक्टोबर २०२४: पुण्यातील खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदरासंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांत रस्सीखेच सुरु आहे. निवडणूक न लढविल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे महायुतीने वडगाव शेरी व खडकवासल्यात मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतला, भाजपने माजी आमदार जगदीश मुळीक यांना तर खडकवासल्यातून भाजपचे आमदार भीमराव तापकीर माजी महापौर दत्ता धनकवडे रिंगणात उतविण्याचे निश्चित झाले. पण दोघेही निवडणूक कार्यालयात असताना मुळीक यांना देवेंद्र फडणवीस यांचा तर धनकवडे यांना अजित पवारांचा फोन गेला आणि अर्ज न भरता दोघेही अर्ज न भरता परतले.
पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी वडगाव शेरी व हडपसर या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. तर कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनग, पर्वती, कोथरूड आणि खडकवासला येथे भाजपचे आमदार असल्याने या जागा भाजप लढविणार आहे.
मुळीक हे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली, त्यामुळे त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. पण जागा वाटपात ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आमदार सुनील टिंगरे हे देशभर गाजलेल्या वादग्रस्त पौर्शे प्रकरणात बदनाम झालेले आहेत. त्यांनी आरोपींना मदत केल्याने त्यांच्यावर टीका केली जाते. त्यामुळे त्यांची उमेदवारी नाकारली जाईल अशी शक्यता होती, पण अजित पवारांनी त्यांनी उमेदवारी दिली आहे. नाराज झालेल्या जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली. पण पक्षाच्या आदेशाची वाट बघत होते. अखेर आज सकाळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास संपती दिली आहे. वडगाव शेरीत आता सुनील टिंगरे, जगदीश मुळीक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्याती तिरंगी निवडणूक होणार होती.
मुळीक यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले, ते अर्ज भरण्यासाठी आतमध्ये गेले. तेवढ्यात त्यांना उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी फोन करून अर्ज न भरण्याचे आदेश दिले. यामळे मुळीकांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शेवटी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांनी फोनवरून संवाद साधून मुळीक यांना विधीमंडळा नेण्याची जबाबदारी माझी असे सांगत परत जाण्यास सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथून अचानक राष्ट्रवादीचे दत्ता धनकवडे यांचा अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्याकडून त्यांना एबी फॉर्म भरण्यासाठी दिला होता. धनकवडे हे अर्ज भरण्यासाठी तेथे गेले असता, त्यांना अजित पवार यांनी फोन करून मी सांगेल तो पर्यंत अर्ज भरायची नाही असे सांगितले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही धनकवडे यांना फोन करून अर्ज न भरण्याची सूचना केली. अखेर तीनची वेळ उलटून गेली आणि धनकवडे यांना अर्ज भरता आला नाही.
More Stories
पुणे: वाघोलीत बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली
पुणे वाहतूक पोलीस अकॅडमीत १००% अधिकारी-अंमलदारांना प्रशिक्षण; १८ सत्रांत मान्यताप्राप्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार