May 19, 2024

पुणे: मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेलया जंगळ्या सतापुतेला बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 1 ची कारवाई

पुणे, ०७/०४/२०२३: खुनाचा प्रयत्न, खंडणी चा गुन्हा दाखल होऊन मोक्काची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेलया सराईताला गुन्हेशाखेच्या युनिट 1 ने बेड्या ठोकल्या आहे.

विशाल उर्फ जंगळ्या सातपुते असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी वस्तीत राहणारा उमेश वाघमारे यास गललीतुन जोरात गाडी चालवू नको असे सांगितलेले असताना त्याने मी या वस्तीचा भाई आहे तुला माहिती नाही का ? तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्या कारणावरून् फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा व्यक्ती याने फिर्यादीचा रस्ता आडवून आमचा भाई जंगळ्या सातपुत जेलमधून सुटला आहे. त्याने तुझ्याकडून 40 रूपये घेवून ये असे सांगतले होते.

त्यावर फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता तुला अर्ध्या तासात दाखवतो म्हणून उमेश वाघमारे, आदीत्य बनसोडे, मंदार खंडत्तगळे, कुमार लोंढे व त्याच्या साथीदारांनी टोळी प्रमुख विशाल उर्फ जंगल्या सातपुते याच्या सांगण्यावरून फिर्यादीवर धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यात तपास करत असतना जंगळ्या हा उरूळी कांचन परिसरा लपून बसला असल्याची माहिती अंमलदार अमोल पवार यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद याची माहिती देऊन जगळ्याला उरूळी कांचन येथील गगन आकांशा सोसायटीतून ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अमंलदार इम्रान शेख, आण्णा माने, निलेश साबळे महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.