पुणे, दि. १०/०३/२०२३: शहरभरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकाविण्याचा घटनांचा आलेख कमी होत नाही. अशातच दोन चिमुरड्यांनी दाखविलेल्या धाडसाने सोनसाखळी चोरट्याला पळ काढावा लागला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजीसोबत असलेल्या दोन्ही नातींनी चोरट्याचा प्रतिकार करीत त्याला मारहाण करीत पळवून लावले. नातींच्या कतृत्वाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
ऋत्वी घाग (वय १०) आणि ज्ञानेश्वरी घाग (वय ६) असे जिगरबाज चिमुरडींची नावे आहेत. याप्रकरणी लता नारायण घाग (वय ६३, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्या तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी लता आणि त्यांच्या दोन नाती ऋत्वी आणि ज्ञानेश्वरी २५ फेबु्रवारीला रात्री आठच्या सुमारास मॉडेल कॉलनी परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने लता यांना मॉडेल कॉलनी कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी पत्ता सांगत असताना चोरट्याने अचानकपणे लता यांच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे गंठण हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजीने चोरट्याची गचांडी पकडून ठेवली. ऋत्वी आणि ज्ञानेश्वरीने जोरजोरात चोर -चोर असा आरडाओरड केली. दोघीही चोरट्याच्या अंगावर धावून जात मारायला लागल्या. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने सोन्याचे गंठण सोडून पळ काढला.

More Stories
Pune: बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक-२०२६ बाबत आढावा बैठक संपन्न
महाराष्ट्रात ‘अँटी लँड ग्रॅबिंग कायदा’ लागू नागरीक सोशल फाउंडेशनची करण्याची मागणी
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार