September 17, 2024

पुणे: पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, सासरच्या व्यक्तींवर अखेर गुन्हा दाखल

पुणे, १३/०५/२०२३: मालमत्तेसाठी पत्नी व तिच्या आई-वडिलांनी त्रास दिल्याने पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

संतोषकुमार बाबासो कोरे असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रवीना संतोष कुमार कोरे (राहणार – वरवांड, पुणे), रंजना दामोदर इरळे, दामोदर इरळे, संग्राम दामोदर इरळे, आणि गणेश दिवेकर या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यशोदा बाबासो कोरे( वय – 55 ,राहणार – कोळी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर )यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 21/ 11/2019 ते 31/ 8 /2022 या दरम्यान घडलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार यशोदा कोरे यांचा मुलगा संतोष कुमार यास त्याची पत्नी रवीना त्याची सासू रंजना ईरळे ,सासरे दामोदर इरळे यांनी प्रॉपर्टीसाठी त्याचा छळ केला आणि त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याने 31 /8/ 2022 रोजी संतोषकुमार यानी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आरोपींनी त्याच्या बँक खात्यावरून पैसे काढून पैशांचा अपहार केला. तसेच त्याच्या नावावर असलेले फ्लॅट व जागा बनावट कागदपत्रे सादर करून आरोपी रवीना हीने स्वतःच्या नावावर करून तक्रारदार यशोदा कोरे यांची फसवणूक केली आहे.

सीआरपीसी 156 /3 नुसार हा गुन्हा दाखल झाल्याने गुन्हा दाखल होण्यास विलंब लागल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.