पुणे, ०४/०५/२०२३: शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी छापे घातले. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ४० ठिकाणी कारवाई केली.
बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई करण्यात आली असून या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्राप्तीकर विभागातील मुंबई, पुणे कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून २५० जण सहभागी झाले होते. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी पथके तयार करुन ४० ठिकाणी छापे टाकले.
More Stories
पुणे: पीएमआरडीएच्या तीन टप्यातील कारवाईत; तब्बल साडेतीन हजार अतिक्रमणांवर हातोडा
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
पंतप्रधान आवास योजनेसाठी साडे चार हजार अर्ज