May 3, 2024

पुणे: पीएमपीएल बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगडया चोरणाऱ्या सराईतांना अटक

पुणे, दि. २१/०८/२०२३ – पीएमपील बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कापून चोरणाऱ्या सराईत आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २० हजारांच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत.संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव, वय ४१ रा.मांजरी बुद्रुक,पवार बिल्डींग, वरद हॉस्पिटल, हडपसर, मूळ गुलबर्गा, कर्नाटक आणि सुधीर ऊर्फ तुंडया नागनाथ जाधव वय ४५ रा. शास्त्री नगर साईनाथ मंदीरा शेजारी अंबरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक पीएमपील बसमध्ये चोरीचा तपास करीत होते.

त्यावेळी पोलीस नाईक रविंद्र लोखंडे आणि आजीनाथ येडे यांना सराईत चोरट्यांची माहिती मिळाली. बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगडया कटींग करुन चोरणारा संतोष जाधव व त्याचा साथीदार कोरेगाव पार्क परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, उप निरीक्षक शाहिद ,बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, आजिनाथ येडे,गणेश ढगे,धनंजय ताजणे,मॅगी जाधव, शिवाजी सातपुते, सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, यांनी केली आहे.