July 27, 2024

पुणे : स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने पुण्यात प्रथमच ‘खासदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहे.

पुणे, 19 may 2023: या स्पर्धेत पुणे शहरातील 16 संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा सहकारनगर येथील शिंदे हायस्कुल मैदानावर 20 व 21 मे 2023 रोजी होणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन उद्या शनिवार 20 मे रोजी सकाळी 7:30 वाजता प्रसिद्ध क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर, खासदार प्रकाश जावडेकर व आमदार  माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार आहे. समारोप व बक्षीस समारंभ 21 मे रोजी दुपारी 4 वाजता सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री चंदू बोर्डे, पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील व खासदार श्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.

स्पर्धेत एस एम जी चॅम्पियन(सांगवी), आलम भाई पठाण क्रिकेट क्लब (वारजे), हमराज – मृत्युंजय (कोथरूड), युवराज गोगावले प्रतिष्ठान (शिवगंगा खोरे), रहीम इलेव्हन (खराडी), यशवंत भाऊ पासंगे प्रतिष्ठान (शिरूर), सचिन भाऊ शेळके युवा मंच (धनकवडी), मैत्री प्रतिष्ठान (कोथरूड), श्री तेज इलेव्हन (भोसरी), इंदिरानगर क्रिकेट क्लब (इंदिरानगर), स्व.संजय शेळके व स्व. ऋषिकेश वांजळे प्रतिष्ठान (कोथरूड), कर्णवीर केसरी प्रतिष्ठान (कराड), मैत्री ग्रुप (मंचर), सह्याद्री प्रतिष्ठान (सहकारनगर), गणेश भाऊ जाधव इलेव्हन (कात्रज), राजमुद्रा ग्रुप (कोथरूड) हे १६ संघ झुंजणार आहेत. तसेच, ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

देशामध्ये 171 हुन अधिक लोकसभा व राज्यसभा खासदारांनी विविध खेळांच्या स्पर्धा भरावल्या व त्याला युवकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व 75000 रुपये, उपविजेत्या संघाला 50000 रुपये व करंडक आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला करंडक व 25000 रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज व सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांना प्रत्येकी 5000 रुपये आणि करंडक, तर  मालिकावीराला करंडक व 11000 रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नेहेमी आग्रह आहे कि राजकारण हे मूळ समाजकारणच असले पाहिजे. ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ यशस्वी करायची असेल तर सर्वत्र युवकांना खेळण्याच्या अधिक सुविधा व संधी मिळाल्या पाहिजेत. स्वतः प्रधानमंत्री विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यान बरोबर संवाद करतात व त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी फोन करून अभिनंदन करतात. मेरी कोम व पी.टी. उषा अशा खेळाडूंना राज्य सभेत  नियुक्त करण्यात आले. खेलो इंडिया स्पर्धांना फार मोठा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी तो वाढत आहे. ‘देश खेलेगा तो देश खिलेगा’, हे प्रधानमंत्र्यांचे धोरण आहे.