September 21, 2025

पुणे: महावितरणचे नवीन लोहगाव शाखा कार्यालय कार्यान्वित, ६९ हजारांवर वीजग्राहकांना दर्जेदार सेवा

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५: महावितरणच्या नगररोड विभाग अंतर्गत धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन लोहगाव शाखा कार्यालयाची व नवीन १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन वास्तुसह लोहगाव शाखा कार्यालय मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.

वाढत्या नागरीकरणामुळे महावितरणकडून धानोरी व लोहगावसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू झाले असून या दोन्ही कार्यालयांमुळे व वाढलेल्या तांत्रिक मनुष्यबळामुळे सुमारे ६९ हजार वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे.