October 3, 2024

पुणे: महिलांना मौल्यवान भेटवस्तुचे अमिष दाखवणार्‍याला दिल्लीतून बेड्या

पुणे, २६/०४/२०२३: अमेरिका, लंडन येथील डॉक्टर, पायलट असल्याचे भासवत तरूणींना व महिलांना फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून मौल्यवान पार्सल पाठविल्याचे सांगत नंतर कस्टम विभागातील अधिकारी असल्याचे सांगून लाखो रूपये उकळणार्‍या परदेशी नागरिकाच्या पुणे सायबर पोलिसांनी दिल्ली येथून मुसक्या आवळल्या.

रॉबीनहूड ओहक (39, रा. सुनिल डेअरी जवळ, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका तरूणीसह अन्य महिलांची एकूण 11 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेला आरोपी हा तरूणी आणि महिलांना फेसबुकद्वारे फ्रेंडरिक्वेस्ट पाठवत होता. तसेच तो त्यांना आपण अमेरीका, लंडन येथे पायलट, डॉक्टर अशी नोकरी करत असल्याचे भासवत होता. त्यानंतर महिलांबरोबर मैत्रिपुर्ण चॅटींग करून तो त्यांना मौल्यवान पार्सल पाठविल्याची बतावणी करत होता. त्याबरोबरच त्याच महिलांना काही दिवसांनी कस्टम अधिकारी असल्याचा फोन करून दिल्ली येथून कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवून पार्सल सोडविण्यासाठी,  पासर्लल क्लिअरनस्, जीएसीटी, आयएमएफ व मनी लॉन्ड्रींग प्रमाणपत्र अशी विविध कारणे सांगून तो विविध खात्यावर पैसे पाठविण्यास सांगत होता. या प्रकाराला देखील महिलांनी साथ दिली. या दरम्यान तब्बल 11 लाख 40 हजार पाठवले. दरम्यान फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिस ठाणे गाठले. सर्व तांत्रिक तपासावरून सायबर पोलिसांना आरोपी हा दिल्ली येथे असल्यो समजले. पुण्यातून पथक पाठवून त्याला दिल्लीतून ताब्यात घेत ट्रान्झींट रिमांडद्वारे पुण्यात आणले.

त्याच्या चौकशीत पोसिांनी चार मोबाईल, एक हार्डडिक्स, पेनड्राईव्ह, 15 सिमकार्ड, सात डेबीटकाडृ व इतर साहित्य जप्त केले. त्याला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले, अमंलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, निलेश लांडगे, सोनाली चव्हाण, संदेश कर्णे, शाहरूक शेख, नितीन चांदणे यांच्या पथकाने केली.