July 27, 2024

पुणे ओशो आश्रम गोंधळ: पत्रकारसह १०० ते १२५ जणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे, २३/०३/२०२३: कोरेगाव पार्क परिसरातील ओशो आश्रम येथे शिष्यांना गळ्यात माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी केल्याने बुधवारी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर शिष्यांनी बळजबरीने आश्रमात प्रवेश केल्याने पोलिसांनी लाठीमार करत शिष्यांना बाहेर काढले. याप्रकरणी आरोपींवर भारतीय दंड विधान संहिता कलम १४३, १४७, ४५२,३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी गुरवारी दिली आहे.
याप्रकरणी  प्रमोद त्रिपाठी ऊर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी ऊर्फ ऊर्फ स्वामी चैतन्य किर्ती , गोपाल दत्त भारती ऊर्फ स्वामी गोपाल, राजेश वाधवा ऊर्फ स्वामी ध्यान अनुग्रह ,किशोर लाभशंकर रावल ऊर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा ऊर्फ स्वामी अमन विस्मय ,आरी राजदान ऊर्फ कुनिका भट्टी , मिडीया प्रतिनिधी वैभवकुमार पाठक व इतर १०० ते १२० अनुयायी यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत धनेश कुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती ( वय -६५, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
  तक्रारदार यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, ओशो ट्रस्टचे विरोधातील ओशोंचे संबंधित अनुयायी यांनी बेकायदेशीर जमाव २२ मार्च रोजी ओशो आश्रम येथे जमा केला. ओशो आश्रमाचे गेट मध्ये जबरदस्तीने प्रवेश करुन ट्रस्टचे विरोधात घोषणाबाजी करुन,तक्रारदार यांना शिवीगाळ करुन आरोपी प्रमोद त्रिपाठी यांनी ट्रस्टच्या सदस्य साधना (८० वर्षे ) यांना हाताने धक्का बुक्की केली. तसेच ओशो आश्रमाचे विरोधात घोषणाबाजी करुन अनुयांयाना भडकावले आहे. तसेच आरोपी वैभव पाठक हा न्यु इंडीया न्युजचा मिडीया प्रतिनीधी आहे असे सांगुन, आश्रमात विनापरवाना प्रवेश करून त्याने तक्रारदार यास धक्का बुक्की केली आहे.