पुणे, दि.०३/०४/२०२३: शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून सराईतांविरुद्ध मोक्का कारवाईचा तडाखा कायम आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणार्या सराईतासह टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही २० वी कारवाई आहे.
अभिषेक रोहिदास जाधव वय २३ रा. एरंडवणे, (टोळी प्रमुख) तन्मय तानाजी इटकर वय १९ रा नर्हे रस्ता, ईश्वर खंडूलाल चव्हाण वय १८ रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड सुजल संजय कदम वय १८ रा. गोसावी वस्ती, नवीन शिवणे, कर्वेनगर आणि पियुष सतीश जाधव वय २० रा. वारजे अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
सराईत जाधव टोळीने २३ फेबु्रवारीला नंदु अनंता जाधव वय – २२ याचा पाठलाग करुन धारदार हत्याराने वार करुन ठार मारले. आरोपी अभिषेक जाधव याने खूनासाठी नवीन साथीदार सोबत घेवुन संघटीत टोळी तयार केली. अवैद्य मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने हिंसाचाराचा वापर करीत खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरणासारखे गुन्हे केले. त्यामुळे अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी टोळीविरुद्ध मोक्का प्रस्ताव तयार केला. अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. गुन्ह्याचा तपास एसीपी राजेंद्र गलांडे करीत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, एसीपी राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक श्रीमती.संगिता पाटील,उपनिरीक्षक सपताळे यांनी केली.
२० टोळ्याविरुद्ध मोक्का
गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणार्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सराईतांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याविषयी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही २० वी कारवाई आहे.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर