December 13, 2024

पुणे: पोलीस अमलदाराने तरुणीवर केला बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक, गुन्हा दाखल

पुणे, दि. ०४/०७/२०२३: लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अमलदाराने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली असता, आरोपीने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करुण हाताने मारहाण केली आहे. त्याशिवाय तिचा मोबाइल हिसकावून नेला आहे.

पोलीस अमलदार कादीर कलंदर शेख (कार्यरत गुन्हे शाखा-युनीट दोन) याच्याविरुद्ध अत्याचारासह अनुसूचित जाती/जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलम ३(१)(१२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचा साथीदार समीर पटेल आणि इतर तिघांविरुद्धही मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला पोलीस अमलदार सध्या गुन्हे शाखा युनीट दोनमध्ये कार्यरत आहे. मागील तीन वर्षांपुर्वी त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत आरोपीने अत्याचार केला. दरम्यान, १ जुलैला आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल परिसरात आरोपी कादीर शेख, समीर पटेल, दोन अनोळखी साथीदार व एक बुरखेधारी महिलेने संगनमताने फिर्यादी तरुणीला हाताने मारहाण केली. आरोपी कादिरने तिला मारहाण करीत हातातील मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख तपास करीत आहेत.