पुणे, ०२/०५/२०२३: मित्र-मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी एकाने पोलिसांचा गणवेश परिधान केला. गणवेशावर त्याने चप्पल घातली. याच चप्पलेमुळे त्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या ताब्यात घेतले. ओैंध परिसरात ही घटना घडली.
यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. नडे काॅलनी, तापकीरनगर, काळेवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक अणि तपास पथकातील पोलीस कर्मचारी ओैंध परिसरात गस्त घालत होते.
राम नदीच्या पुलावर एक पोलीस कर्मचारी थांबल्याचे गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने पाहिले. पोलीस वाहनातील कर्मचाऱ्यांना संशय आला. अनोळखी चेहरा वाटल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी सुरु केली. कोणत्या पोलीस चौकीत नियुक्तीस आहे, अशी विचारणा पोलिसांना धुरी याच्याकडे केली. तेव्हा धुरीने ओैंध चौकीत नियुक्तीस असल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. तेव्हा त्याने पायात चप्पल घातल्याचे लक्षात आले. घुरी याच्या टोपीवर पिंपरी-चिंचवड पोलीस असले लिहिण्यात आले होते. धुरी खोटे बाेलत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संशयावरुन धुरीला ताब्यात घेतले. धुरीने डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करत असल्याची कबुली दिली. मित्र-मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचे सांगितले. धुरी याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार कापरे तपास करत आहेत.
More Stories
महाबँक कर्मचार्यांचे धरणे आंदोलन : विविध मागण्यांसाठी २० मार्च रोजी देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा
पुणे-नगर रस्त्यावरील खराडी ते वाघोली वाहतूक कोंडीवर पोलिसांची विशेष मोहीम ठरली यशस्वीः या भागातील वाहतूकीचा वेग आता १६ ते १९ टक्क्यांनी वाढला
बीडमधील वाढती गुन्हेगारी ही सत्तेच्या गैरवापराचा दुष्परिणाम ः शरद पवारांनी व्यक्त केले मत