पुणे, ०२/०४/२०२३: शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका वकिलासह व्यावसायिकाच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी ॲड. विक्रम भाटे (वय ३४) आणि वैभव शिंदे (वय ३४) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत तरुणी आणि ॲड. भाटे, शिंदे यांची ओळख होती. ॲड. भाटे आणि शिंदे तरुणीच्या घरी गेले होते. त्या वेळी त्याने तिला शीतपेयात मिसळून गुंगीचे ओैषध दिले. तरुणीला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पीडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर त्यांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. धमकावून त्यांनी दुसऱ्या व्यक्तीशी शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे तिने फिर्यादीत नमूद केले. आरोपींनी मारहाण करुन धमकावले. त्यांच्या धमक्यांमुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. बलात्कार, धमकावणे तसेच अनैसर्गिक कृत्य केल्या प्रकरणी ॲड. भाटेसह शिंदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.