December 14, 2024

पुणे: नगर रोड बीआरटी मार्ग हटवण्याचे काम सुरू

पुणे, २४/०६/२०२३: नगर रस्त्यावरील येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉल पर्यतच्या बीआरटी मार्ग काढण्याच्या कामास शनिवारी सकाळपासून सुरवात झाली. मेट्रोच्या कामामुळे बीआरटीचा सर्व मार्ग बंद अवस्थेत होता. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर हा मार्ग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि वाहतूक पोलिस यांच्यात चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

“नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी मार्गिका काढावी अशी मागणी मी सातत्याने करत होतो. विधीमंडळ अधिवेधनातही हा प्रश्न उपस्थित केला होता. अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी एकत्र येऊन बंद अवस्थेत असलेला गुंजन चौक ते हयात हॉटेलपर्यतचा बीआरटीमार्ग प्रायोगिक तत्त्वावर काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निश्चितच नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मी वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो.” – सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी