December 14, 2024

पुणे: पीएमपीएमएल कडून एक बसमार्ग पूर्ववत, तीन बसमार्गांचा विस्तार व एका बसमार्गामध्ये बदल

पुणे, २३/०५/२०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. २६ – धनकवडी ते शिवाजीनगर (मार्गे-स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड) हा बसमार्ग पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. तसेच बसमार्ग क्र. ५०, ८८ व ३७६ या तीन बसमार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. याचबरोबर बसमार्ग क्र. ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात येत आहे. हे सर्व बदल दि. २५/०५/२०२३ पासून करण्यात येणार आहेत.

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे
मार्ग क्रमांक २६ – धनकवडी ते शिवाजीनगर
मार्गे – स्वारगेट, टिळक रोड, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड
बस संख्या – २
वारंवारिता – ५५ मिनिटे

मार्ग क्रमांक ५० – शनिवारवाडा ते सिंहगड पायथा
या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे शनिवार वाड्यापर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – ४
वारंवारिता – ५० मिनिटे

मार्ग क्रमांक ८८ – अप्पर ते मेडी पॉईंट
या मार्गाचा विस्तार स्वारगेटच्या पुढे अप्पर डेपो पर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास १० मिनिटे

मार्ग क्रमांक ३७६ – मनपा भवन ते पिंपरीगाव
या मार्गाचा विस्तार मासुळकर कॉलनी च्या पुढे पिंपरी गाव पर्यंत करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे

मार्ग क्रमांक ३११ – पिंपरीगाव ते पुणे स्टेशन
या मार्गात बदल करून मोरवाडी चौक, मासुळकर कॉलनी, वायसीएम हॉस्पिटल, खडकी बाजार मार्गे करण्यात आला आहे.
बस संख्या – २
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे

वरीलप्रमाणे प्रवाशांच्या मागणीनुसार व सोयीसाठी दि. २५/०५/२०२३ पासून बसमार्ग सुरू करण्यात येत असून या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक व रूग्ण यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.