पुणे, २७/०५/२०२३: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.
सचिन भीमराव वाघमोडे (रा. लक्ष्मण टाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या उमेदावाराचे नाव आहे. भिगवण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. वाघमाेडे भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली.
भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. निवड झालेला उमेदवार वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय आला होता. त्यानंतर बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर वाघमोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन