पुणे, दि. २२/०५/२०२३: शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणार्या सराईतांना तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी वानवडी, कोंढवा, खडक, हडपसर परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले असून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दिनेश रघुनाथ शिंदे (वय २८ हडपसर ) आणि आकाश तुळशीराम ननवरे (वय २५ रा. गोसावी वस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडर बायपासजवळ दुचाकीवरून जाणार्या दोघांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी भरधाव गतीने वाहन चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत सराईत दीनेश आणि आकाशने ८ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ३ लाख ६५ हजारांची वाहने जप्त केली.
वाहनचोरीच्या दुसर्या गुन्ह्यातील आरोपी बरकत अब्दुल शेख (वय ४५ रा. हांडेवाडी रोड, हडपसर) याला पोलिसांनी २४ तासांमध्ये ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णीक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा, एसीपी पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक संदिप शिवले, उपनिरिक्षक संतोष सोनवणे, रासगे, अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, हरिदास कदम, अतुल गायकवाड, राहुल गोसावी, संदिप साळवे, निलकंठ राठोड, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड, मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर