July 22, 2024

पुणे: वीजेचा धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू, शिवणे भागातील दुर्घटना

पुणे, २८/०६/२०२३: कुंपणात उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली.
शुभम बाळू इंगोले (वय १६, रा. ढोणे हाइट्स, शिंदे पुलाजवळ, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शुभम शिवणे भागातील नवभारत हायस्कूलमध्ये दहावीत होता. तो सकाळी अकराच्या सुमारास शाळेत निघाला होता. शिवणे भागताील देशमुखवाडी परिसरातील छोट्या गल्लीतून तो मित्राकडे जात होता तेथील एका कुंपणाच्या लोखंडी जाळीत वीजप्रवाह उतरला होता.

शुभमने जाळीला स्पर्श केला आणि वीजेचा धक्का बसून तो कोसळला. त्याला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पाहणी करुन पंचनामा केला.