December 14, 2024

पुणे: वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिस तडकाफडकी निलंबीत, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचा रुद्रावतार

पुणे , दि. २९/०६/२०२३: गुन्ह्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. चार गुन्ह्याची दखल न घेतल्याने या घटनेला जबाबदार धरत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकारनगर पोलिसांचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह सात जणांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.

गुन्हे निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, उपनिरीक्षक मारूती वाघमारे, पोलिस हवालदार संदीप पाटकुळे आणि पोलिस हवालदार विनायक जांभळे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. निलंबनामध्ये अटी व शर्तीचे पालक करण्याचेही आदेशात म्हटले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.