May 3, 2024

पुणे: शेवाळेवाडीतील बांधकाम साईटवर कारवाई करा; ग्रामस्थांची पोलिस आयुक्तांनकडे मागणी

शेवाळेवाडी, २७ फेब्रुवारी २०२४: शेवाळेवाडी गावात शापूरजी पालोनजी हौसिंग प्रा. लि. यांच्यामार्फत जॉयविले या नावाने मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत मात्र याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे या ठिकाणी दिवसा तसेच रात्री देखील बांधकामाचे काम सुरू असल्याने प्रचंड आयोजित आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित बिल्डरावर खडक कारवाई करावी अशी मागणी शेवाळवाडी ग्रामस्थांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदनाद्वारे केलेली आहे यावेळी शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे, शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच मंगल कोद्रे, पोलीस पाटील अमृता खेडेकर, राजेंद्र भिंताडे, बाळकृष्ण शेवाळे, अजित शेवाळे, अलंकार खेडेकर यांच्यासह विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ताबडतोब कारवाई चे आदेश दिले आहेत.

या साईटवर काम करणारे कामगार रात्रभर दारू पिऊन मोठमोठ्याने बोलून धिगांना घालत असतात. रात्रीच्या वेळी मालवाहतूक करणाऱ्या गाड्या कर्कश हॉर्न वाजवतात. परिसरात मोठ्या प्रमाणात हवा आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

गावात राहणाऱ्या लहान मुलांना, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना याचा खूप त्रास होत असून याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. कंपनी व्यवस्थापनास सांगूनही त्रास बंद झाला नाही, उलट कंपनी कडून स्थानिक नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच येथे वारंवार भांडणे होत असून हे मजूर परिसरात उघड्यावर मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन करून गावकऱ्यांना त्रास देत आहेत. याच भांडणातून गेल्या महिन्यात गावातील एका तरुणाचा खून झाला होता, आपण याकडे गांभीर्याने लक्ष देवून या जॉयविले बांधकामावर त्वरीत गुन्हा दाखल करून कारवाई करावी,अशी मागणी करणारे निवेदन यावेळी पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.