May 19, 2024

पुणे: दोन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

पुणे, ०४/०४/२०२३: मृत आईचे सात बारा वरील नाव कमी करण्यासाठी तलाठ्याने दोन हजार रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे. तलाठीने मदतनीस खाजगी व्यक्ती मार्फत पैसे स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगीहात पकडले आहे. सदर दोघांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांनी तक्रारदार यांची मृत आई यांचे सातबारा वरील नाव कमी करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. यावर तक्रारदार यांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर लेखी तक्रार दिल्यानंतर, याची पडताळणी करून एसीबी पथकाने सापळा रचला. यात तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासाठी खाजगी व्यक्ती नारायण शेंडकर यांनी ही दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.पुढील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सह्यक पोलीस आयुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.