पुणे, १४/०३/२०२३: दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने पकडले. माने याच्यासह नऊ साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काेयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), रोहित मधुकर जाधव (वय २७), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय प्रमोद डिखळे (वय १८), मोन्या उर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपी आणि त्यांचे साथीदार पल्या पासंगे (वय २१), आयुष किसन माने (वय २१ दोघे रा. गुलटेकडी), माया उर्फ अभिषेक पाटोळे (वय २२) प्रमोद उर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुलटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील (मीनाताई ठाकरे वसाहत) वर्चस्वाच्या वादातून सचिन माने आणि साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. माने आणि साथीदारांनी कोयते उगारुन परिसरात दहशत माजविली होती. तोडफोड करुन आरोपी माने साथीदारांसह पसार झाला होता. पसार झालेला माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावुन मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर कोयता उगारला. झटापटीत पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.