पुणे, १५-४-२०२१: दरोडा, जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 14 गंभीर गुन्हे असलेला आरोपी नामे चंद्रकांत लोखंडे वय 32 रा. ढवळ ता. फलटण. जि.सातारा याने पुणे, सातारा, नवी मुंबई जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती.
राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेली होती. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की वरील आरोपी नामे चंद्रकांत लोखंडे हा नीरा.ता पुरंदर या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले होते.
दि. १७ फेब्रुवारी २०२० रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटे 5/6 च्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे लॉकप मधून पळून गेले.
सदर ची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना मा.पोलीस अधीक्षक सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेपुढे होते.
आज बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की चंद्रकांत लोखंडे हा मुंबई वरून कर्नाटक याठिकाणी ट्रॅव्हल्स मधून निघाला आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. पथकाने मुंबई एक्सप्रेस ला सदर बसचा पाठलाग सुरू केला.चांदणी चौक पास करून सदर बस खेडशिवापुर च्या दिशेने पुढे निघाली.बसचा सिनेस्टईल पाठलाग करून खेडशिवापुर या ठिकाणी बस आल्यावर बस ताब्यात घेऊन झडती घेतली असता चंद्रकांत लोखंडे बस मध्ये आढळून आला.त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले असून त्याची वैदकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.सदर आरोपीवर
शिरवळ पो स्टे गु.र.न 77/2017 भादवी 393,34
वडगाव नि पो स्टे 166/2017 भादवी 393,34
लोणंद पो स्टे 266/2017 भादवी 399,402
लोणंद पो स्टे 267/2017 भादवी 457,380,34
लोणंद पो स्टे 269/2017 भादवी 399,34
लोणंद पो स्टे 385/2020
भादवी 393,34
लोणंद पो स्टे 418/2020भादवी 392,34
जेजुरी पो स्टे256/2020 भादवी 454,457,380
जेजुरी पो स्टे 323/2020भादवी 454,457,380
राजगड पो स्टे 509/2020 भादवी 395,397,307 आर्म ऍक्ट 3,25
बारामती तालुका पो स्टे 601/2017 भादवी 392,34 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक, विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण चे मा. श्री पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, पोसई अमोल गोरे पोसई रामेश्वर धोंडगे, पोह शिंदे, पो.ना मोमीन, पोशी शेडगे ,पोशी भगत ,पोशी खडके,पोशी नवले, पोशी घाडगे, सहा फो जगताप, सहा फो पठाण, पोह निश्चित, पोह तांबे, चालक पोह राजापुरे,पोह कदम, पोशी जावळे , नाईकनवरे यांनी केली आहे.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद