पुणे, दि. १७/०७/२०२३: जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात शिरून सव्वा लाखांचा ऐवज चोरुन नेणार्या दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २५जूनला मॉडेल कॉलनी परिसरात घडली होती. मिराबेन सुनिल सोंळकी (वय ३५, रा- खंडोबानगर, सासवड), आणि गिता विजय कांगिया ( वय ४५, रा खंडोबानगर, सासवड, मुळ, रा साबरमती, गुजरात ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला २५ जुनला मॉडेल कॉलनी परिसरात फिरत होत्या. त्यावेळी फिर्यादीने त्यांना जुने कपडे खरेदीसाठी घरात बोलाविले होते. त्यावेळी आरोपी महिलांनी आम्हाला भुक लागली आहे, आम्हाला जेवण मिळेल का अशी भावनिक साध घातली. त्यामुळे फिर्यादीने त्यांना घरात बोलावून जेवण खाउ घातले. त्यानंतर फिर्यादी महिला बाहेर गेलेचे पाहताच चोरट्या महिलांनी दोन अंगठी, मोबाईल रोकड असा सव्वा लाखाचा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निराक्षक अरविंद माने आणि सायबरचे एपीआय बाजीराव नाईक, उपनिरीक्षक निसार शेख, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी तपास केला.
तांत्रिक तपासानुसार आरोपी महिला सासवड परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार दोन्ही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मोबाईल आणि २५ हजारांची रोकड जप्त केली. ही कामगिरी एसीपी वंसत कुंवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक, निसार शेख, रुपेश वाघमारे, पो अंमलदार आदेश चलवादी, महिला पोलीस अंमलदार रुचिका जमदाडे यांनी केली.
More Stories
मुलाने पाच लाख बुडवले : जामीनदार बापाला एक वर्षाच्या कारावसासह दहा लाखाची भरपाईची शिक्षा
जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभाग पुणेतर्फे लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘नैतिकता मोहीम’ सुरू
‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी (ता. १३) आयोजन