June 14, 2024

पुणे: पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी मारण्याची दिली धमकी, कॉफी शॉपच्या काउंटरचे केले नुकसान

पुणे, दि. १९/०३/२०२३: पोलिस तक्रार मागे घेण्यासाठी एकाला धमकावून त्याला ठार मारण्याची धमकी टोळक्याने दिली. त्याशिवाय कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयता मारुन नुकसान केल्याची घटना १८ मार्चला पाच वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील बनस कॉफी शॉपमध्ये घडली.

निखील मधुकर कांबळे, हुसेन उर्फ सोन्या युनूस शेख, हर्ष जाधव, सिद्धार्थ भोला, साहिल पिटर कांबळे, सुदेश रुपेश गायकवाड, तुषार चव्हाण अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित वाघमारे (वय २१ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखील कांबळे सराईत असून रोहितने काही दिवसांपुर्वी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात ठेउन आरोपी निखीलने साथीदारांना जमवून १८ मार्चला बनस कॉफी सेंटरमध्ये रोहितला गाठले. त्याला पोलिस ठाण्यातील केस मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर टेस्टी बन कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयत्याने मारुन नुकसान करीत शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करीत आहेत.