June 24, 2024

पुणे: तरुणाचे अपहरण करणार्‍या महिलेसह तिघांना अटक, उत्तमनगर पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. २६/०६/२०२३: तरुणाचे मोटारीतून अपहरण करणार्‍या महिलेसह तिघांना उत्तमनगर पोलिसांनी गुजरातमधील वापी परिसरातून अटक केली आहे. ही घटना २२ जूनला कोंढवे धावडे परिसरात घडली होती. आरोपींमध्ये महिलेसह तिघांचा समावेश आहे.

प्रथमेश राजेंन्द्र यादव (वय २१ रा.बच्छाव वस्ती, पुसेगाव ता. खटाव सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय २६ रा. पुसेगाव गोरेवस्ती, ता.खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिलीप गोरख पवार (वय २३ रा. कोंढवे धावडे) असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे.

कोंढवे धावडे परिसरातून २२ जूनला महिलेसह तिच्या दोघा साथीदारांनी दिलीप पवार याचे मोटारीतून अपहरण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार एपीआय दादाराजे पवार, हजारे, हुवाळे, पाडाळे हे वापीला रवाना झाले.

हॉटेल यात्री निवासमध्ये छापा टाकून दिलीपची सुटका करीत महिला आरोपीला ताब्यात घेतले. तिच्या दोन साथिदारांना पुसेगाव येथे जाउन तपास पथकाने अटक केली आहे. ही कामगिरी अपर आयुक्त प्रविण पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, एपीआय उमेश रोकडे, पोलीस उपनिरीक्षक माने, तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे, हजारे, केंद्रे, किंद्रे गायकवाड, हुवाळे, तोडकर, पवार, पाडाळे यांनी केली.