April 13, 2024

पुणे: सराईतांकडून दोन पिस्तूल, ८ काडतुसे जप्त

पुणे, दि. १०/०७/२०२३: सरारईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल आणि ८ काडतुसे असा पावणेदोन लाखांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनीट दोनने कारवाई करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हनुमंत मोतीराम पवार वय ३१ रा. येलवडी खेड पुणे आणि ऋषिकेश सुदाम बोत्रे २९ रा. खेड जिल्हा पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खून, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, घरफोडी, चेन स्नाचींगतसेच तडीपार आरोपींचा शोध घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग करण्यात येत आहेत. युनीट दोनचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दोघा सराईतांची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार हनुमंत पवार आणि ऋषीकेश बोत्रे याला अटक करुन दोन पिस्तुल जप्त करण्यात आली. ही कामगिरी उपायुक्त अमोल झेंडे , एसीपी
सुनील तांबे, पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, एपीआय वैशाली भोसले, उपनिरीक्षक, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने,उज्वल मोकाशी यांनी केली.