December 13, 2024

पुणे: पाणी कपात सुरू, शहराचा पाणी पुरवठा दर गुरूवारी बंद

पुणे, ९ मे २०२३: एल निनोच्या प्रभावामुळे जून जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम धरण साठ्यावर होणार आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचा वापर काटकसरीने करा, पर्यायी जलस्त्रोतांची व्यवस्था याचा कृती आराखडा राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असून 18 मे पासून पुढे प्रत्येक गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली.

मॉन्सूनच्या प्रवासात ‘एल निनो’चा अडथळा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणी पुरवठ्यावर होणार असल्याने आत्तापासूनच त्यासंदर्भातील नियोजन पाटबंधारे विभाग आणि महापालिकांनी करावे अशा सूचना राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव मनोकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या होत्या. देण्यात आल्या आहेत. तसेच पाण्यासाठी बोअर, विहिरी यासह इतर पर्यायी जलस्रोतांचे नियोजनही करावे अशी सूचना देण्यात आली आहे.

गेल्याच महिन्यात पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागाने ‘एल निनो’च्या पार्श्‍वभूमीवर बैठक घेऊन पाण्याच्या नियोजनासाठी चर्चा केली. त्याचा अंतिम निर्णय एप्रिल महिन्यात होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये होईल असे सांगण्यात आले होते. पण राज्य शासनानेच आज बैठक घेऊन काटकसरीने पाणी वापरा अशी सूचना दिल्याने प्रशासकीय हालचालींना वेग येणार आहे.

खडकवासला धरण प्रकल्पात साधारणपणे ११ टीएमसी पाणी शिल्लक आहे हे पाणी १५ ऑगस्ट पर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे महापालिकेला दर महिन्याला साधारणता सव्वा टीएमसी पाणी लागत आहे. त्यामुळे पाणी कपात व पाणी काटकसरीने वापरावे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीसाठ्याचा आढावा घेतला त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १८ मे पासून प्रत्येक गुरुवारी शहराचा संपूर्ण पाणीप्रश्न बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.