रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सामन्यात 110 अधिक गटात पीवायसीच्या हिमांशू गोसावी व जयंत कढे यांनी खार लिजेंड्सच्या भूषण अकुत व गौरव कपाडिया यांचा टायब्रेकमध्ये 8-7(7-2) असा पराभव केला. 100 अधिक गटात पीवायसीच्या केदार शहा व प्रशांत गोसावी या जोडीने लविन खेमानी व गौतम चांदे यांचा 8-1 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवुन दिली. 90 अधिक गटात अनुप मिंडाने योगेश पंतसचिवच्या साथीत वर्धन शहा व अमित तांबे या जोडीचा 8-3 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. सामन्यात विजयी आघाडीवर असलेल्या पीवायसी संघाने अखेरच्या खुल्या गटात 2-2 अशी स्थिती असताना पीवायसीच्या अभिषेक ताम्हाणे व केतन धुमाळ आणि इम्रान युसूफ व अमन कोहली यांच्यातील सामना थांबविण्यात आला.
3 ऱ्या व 4थ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत महेंद्र लिखिते, आकाश काळे, करण सिंग, विमल रॉय, राजेश नायर, रोहन माणिक, आनंद मूर्ती, आदित्य संघवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) संघाने पीवायसी ब संघाचा 24-14 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या पीवायसी अ संघाला करंडक व 1 लाख 25 हजार रुपये, तर उपविजेत्या खार लिजेंड्स संघाला करंडक व 75000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला 25000 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. पीवायसी ब संघाच्या डॉ अभय जमेनीसला सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
पीवायसी अ वि.वि.खार लीजेंड्स 26-13(110 अधिक गट: जयंत कढे/हिमांशु गोसावी वि.वि.भूषण अकुत/गौरव कपाडिया 8-7(7-2); 100 अधिक गट: केदार शहा/प्रशांत गोसावी वि.वि.लविन खेमानी/गौतम चांदे 8-1; 90 अधिक गट: अनुप मिंडा/योगेश पंतसचिव वि.वि.वर्धन शहा/अमित तांबे 8-3; खुला गट: केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि.इम्रान युसूफ/अमन कोहली 2-2);
3 ऱ्या व 4थ्या स्थानासाठी लढत: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) वि.वि.पीवायसी ब 24-14(110 अधिक गट: महेंद्र लिखिते/आकाश काळे वि.वि.अभय जमेनिस/सारंग देवी 6-4; 100 अधिक गट: करण सिंग/विमल रॉय वि.वि.सुंदर अय्यर/अमित नाटेकर 6-3; 90 अधिक गट: राजेश नायर/रोहन माणिक वि.वि.ध्रुव मैड/श्रवण हर्डीकर 6-3; खुला गट: आनंद मूर्ती/आदित्य संघवी वि.वि.अमोघ बेहेरे/रोहित शिंदे 6-4).
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर