March 5, 2026

पीवायसीचे क्रिकेट विभागाचे संचालक निरंजन गोडबोले यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदी निवड

पुणे, 7 फेब्रुवारी 2026: पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या क्रिकेट विभागाचे संचालक निरंजन गोडबोले यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी व्यवस्थापक पदी निवड करण्यात आले आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून या दौऱ्याला प्रारंभ होत आहे.

एक अनुभव क्रिकेट प्रशासक असलेल्या निरंजन गोडबोले यांनी क्रिकेटच्या विकासात आणि प्रशासनात बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पीवायसी क्रिकेट विभागाने नेहमीच पायाभूत सुविधांच्या कार्यक्रमात आणि एकंदरीत कामगिरीत लक्षणीय प्रगती नोंदविली आहे. पीवायसीच्या अनेक क्रिकेटपटूंनी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर उत्कृष्ट कामगिरी बजावताना क्लबचा लौकिक वाढवला आहे. शिस्त, व्यावसायिकता आणि आणि विशिष्ट हेतूने तयार करण्यात आलेला विकास कार्यक्रम या स्तरावर त्यांनी पीवायसीला क्रिकेट विश्वामध्ये एक आदराचे स्थान मिळवून दिले आहे.

भारतीय महिला संघाच्या व्यवस्थापकपदी झालेल्या निवडीमुळे गोडबोले यांचे क्रिकेट बाबतीत सखोल ज्ञान आणि अनेकदा सिद्ध झालेल्या प्रशासकीय क्षमता याबरोबरच राष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पीवायसी हिंदू जिमखाना क्लबला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचे योगदान पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

गोडबोले यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे म्हणाले की, निरंजन गोडबोले यांची भारतीय महिला संघाच्या व्यवस्थापकपदी निवड होणे ही हा क्लब साठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण निष्ठा आणि क्रिकेट प्रशासनातील त्यांचे योगदान हे सर्व गुण आमच्या संस्थेच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या प्रचंड अनुभव आणि विस्तृत नेतृत्व गुण यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खूपच फायदा होईल असा आमचा विश्वास आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या सर्व विभागांमधून तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्व परिवारांमधून त्यांच्या अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच गोडबोले यांना आणि भारतीय महिला क्रिकेट संघाला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

यावेळी निरंजन गोडबोले म्हणाले की, या निवडीमुळे मला अतिशय आनंद होत असून माझ्या नेतृत्वगुणांचा आणि अनुभवाचा या असलेल्या दौऱ्यात भारतीय महिला संघाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.