March 5, 2026

पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धेत मनीषा रॉयल्स, आरएस कॅनन्स, रिओज सोलर एनर्जी संघांचे विजय

पुणे, 7 फेब्रुवारी 2026: पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पुना क्लब बिलियर्ड्स व स्नूकर लीग स्पर्धा 2026(पीसीबीएसएल) स्पर्धेत रिओज सोलर एनर्जी, मनीषा रॉयल्स, आरएस कॅनन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

पुना क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये मुख्य प्रायोजक मनिषा कन्स्ट्रक्शनचे राजन खिंवसरा व अभिषेक खिंवसरा आणिसहप्रायोजक सुनील हांडा, मुकेश संघवी, संजय संघवी यांच्या पाठिंब्यामुळे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत मनीषा रॉयल्स संघाने बॉल ब्रेकर्स संघाचा 3-2 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून कुणाल वासवानी, योगेश अंकलेसरिया, अश्रफ परवानी, अयान खान यांनी अफलातून कामगिरी केली.

दुसऱ्या सामन्यात सूरज राठी, साहिल हांडा, मिनु कारकरिया, नीरज अरोरा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रिओज सोलर एनर्जी संघाने संघवी शुटर्स संघाचा 3-2 असा पराभव केला. अन्य लढतीत आरएस कॅनन्स संघाने मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाचा 3-2 असा पराभव केला. आरएस कॅनन्स संघाकडून कपिल पंजाबी, अनिल काकडे, क्रिश रघानी, रिकी राजपाल यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

निकाल: साखळी फेरी:
रिओज सोलर एनर्जी वि.वि. संघवी शुटर्स 3-2(15रेड स्नूकर एकेरी: सूरज राठी वि.वि.गिरीश खोसला 104-60; बिलियर्ड्स: साहिल हांडा वि.वि.आरके शर्मा 200-158; रुलेट: सूरज राठी/साहिल हांडा/मिनू कारकरिया/नीरज अरोरा/शाहबेहराम रब्बानी पराभुत वि. गिरीश दामले/शाम राठी/रुसी मरोलिया/सुनील आशेर/आरके शर्मा 1-2; 9 रेड स्नूकर दुहेरी: मिनु कारकरिया/नीरज अरोरा वि.वि.शाम राठी/सुनील आशेर 92-57; 6 रेड स्नूकर एकेरी: शाहबेहराम रब्बानी पराभुत वि. गिरीश दामले 27-46, 56-26, 55-62);

आरएस कॅनन्स वि.वि. मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स
3-2(15 रेड स्नूकर एकेरी: पंकज परमार पराभुत वि. रोहिंग्टन इराणी 47-56; बिलियर्ड्स: कपिल पंजाबी वि.वि. राजीव खांडके 200-161; रूलेट: पंकज परमार/कपिल पंजाबी/ रिकी राजपाल/ कैवल्य खानापुरे पराभूत वि. राजीव खांडके/संजय जाधव/रोहिंग्टन इराणी/प्रशांत राजघरिया/मुनीज पूनावाला 03-04; 9 रेड स्नूकर दुहेरी: अनिल काकडे/क्रिश रघानी वि.वि.संजय जाधव/मुनीज पूनावाला 55-40; 6 रेड स्नूकर एकेरी: रिकी राजपाल वि.वि.प्रशांत राजघरिया 50-30, 49-38);

मनीषा रॉयल्स वि.वि.बॉल ब्रेकर्स 3-2(15 रेड स्नूकर एकेरी: कुणाल वासवानी वि.वि.विनोद माखिजा 74-52;बिलियर्ड्स: आशीष खेरा पराभुत वि.आशिष पटेल 175-200; रुलेट: अयान खान/कुणाल वासवानी/योगेश अंकलेसारिया/राजन खिंवसरा/अश्रफ परवानी पराभूत वि. राजीव राऊत/धीरज कोचर/आशिष पटेल/जयदीप पटवर्धन/जमशेद गार्डा 1-3; 9 रेड स्नूकर दुहेरी: योगेश अंकलेसरिया/अश्रफ परवानी वि.वि.जयदीप पटवर्धन/धीरज कोचर 63-22; 6 रेड स्नूकर एकेरी: अयान खान वि.वि.जमशेद गार्डा 58-12, 28-38, 54-24)